नाशिक : सिंघम अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांच्या भीतीनं नाशिक महानगरपालिकेच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीय.
बैठकीत स्वच्छतेबाबत बाबत सूचना करण्यात आल्याने स्वछता विभागाकडून मुख्य कार्यालय पासूनच श्रीगणेशा करण्यात आला. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचे असलेले ब्रीदवाक्य 'स्वछ नाशिक, सुंदर नाशिक' याला खऱ्या अर्थाने आता सुरवात झाल्याचं बोललं जाऊ लागलंय.
सुटी असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पालिकेतील नगररचना विभागात अधिकाऱ्यांची एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी स्वतः नसले तरी सर्वाधिक तक्रारी असलेल्या या विभागात फाईल ट्रॅकिंग कसे करायचे, याची दिशा दाखवीत प्रशासनाला मार्ग दाखविला.