पतीच्या हातून सुटलेल्या बंदुकीच्या गोळीनं पत्नी जखमी

नागपुरात आज एक विचित्र प्रकार घडलाय नवऱ्याच्या हातातल्या बंदुकीतून गोळी सुटल्यानं पत्नी जखमी झालीय.

Updated: Jun 14, 2017, 12:17 PM IST
पतीच्या हातून सुटलेल्या बंदुकीच्या गोळीनं पत्नी जखमी  title=

नागपूर : नागपुरात आज एक विचित्र प्रकार घडलाय नवऱ्याच्या हातातल्या बंदुकीतून गोळी सुटल्यानं पत्नी जखमी झालीय.

सीमा तिवारी असं या ३० वर्षीय जखमी महिलेचं नाव आहे. नागपूरच्या मानकापूर भागात ही गटना घडलीय. बंदुकीतून सुटलेली गोळी महिलेच्या जबड्यात घुसली. त्यात सीमा तिवारी गंभीर जखमी झाल्यात.

पोलिसांनी सीमाचा पती आशिष तिवारीला अटक केलीय... दुसरा आरोपी कुलदीप पांडे फरार  आहे.