नागपूर : ब्राह्मोस मिसाईल संदर्भातील गोपनीय माहिती संदर्भात छेडछाड केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलेला निशांत अग्रवालला आज नागपूर सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी उत्तर प्रदेश एटीएस त्याची कोठडी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. निशांत अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस ऐरोस्पेसमध्ये सिस्टम इंजिनिअर म्हणून काम करीत होता. तो ४० जणांच्या टीमचे नेतृत्व करायचा... उत्तर प्रदेश पोलिसांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी बीएसएफचा जवान अच्युतानंद मिश्राला अटक केल्यावर निशांत अग्रवालचे नाव समोर आल्याची सूत्रांची आहे. त्यानंतर निशांत अग्रवालवर नजर ठेवण्यात आली आणि सोमवारी पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास उत्तर प्रदेश एटीएस व महाराष्ट्र एटीएस पोलिसांच्या मदतीने नागपुरातील उज्वल नगर येथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. यूपी एटीएसने निशांत अग्रवालची दिवसभर निशांत अगरवालची चौकशी केली असून पुढील तपासासाठी त्याची कोठडी मागणार आहेत. याकरिता आज उत्तर प्रदेश एटीएस नागपूर सत्र न्यायालयात अग्रवालला हजर करतील.
नागपुरात अटक करण्यात आलेल्या निशांत अग्रवालला पाकिस्तानच्या आयएसआयनं हनी ट्रॅपमध्ये अडकवलं होतं. देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसाठीच्या पथकात काम करणारा निशांत अग्रवाल... देशाच्या संरक्षणाच्या दष्टीनं महत्त्वाची माहिती निशांत आयएसआयला पुरवत होता, असा संशय आहे. याआधी अशाच पद्धतीनं एका बीएसएफच्या जवानाला अटक करण्यात आली होती. निशांत पाकिस्तानातल्या दोन मुलींना फेसबुकवरुन माहिती देत होता. ही दोन्ही फेसबुक आयडी बनावट होती... निशांतला नोकरीचं आमिषही दाखवण्यात आलं होतं... याच फेसबुक आयडीवरुन लष्करातल्या आणखी काही लोकांना संपर्क करण्यात आल्याचीही माहिती आहे.
निशांतच्या लॅपटॉपमध्ये गोपनीय माहिती मिळालीय. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक, लष्कराचं गुप्तचर पथक आणि महाराष्ट्राचं दहशतवादी विरोधी पथक यांनी संयुक्तरित्या निशांत अग्रवालवर पाळत ठेवली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आयएसआयनं रचलेल्या या हनी ट्रॅपमध्ये अडकून निशांतनं नक्की कुठली माहिती पाकिस्तानला दिलीय, याचा तपास सुरू आहे.