कल्याण रेल्वे स्थानक परिसरात बॅगेत महिलेचा मृतदेह

कल्याण रेल्वे स्थानक स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

Updated: Dec 8, 2019, 03:31 PM IST
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात बॅगेत महिलेचा मृतदेह

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात एका बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाचं धड गायब असल्याने, परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, बॅग ठेवून जाणारा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या याप्रकरणी, महात्मा फुले पोलिस आरोपीचा तपास करत आहेत. 

यापूर्वी मुंबईत अशीच घटना घडली होती, मृतदेहाचे तुकडे तीन बॅगांमधून वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले होते. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठत एका हत्या प्रकरणाची उकल केली आहे. यानंतर कल्याणमध्येही असेच मृतदेहाचे तुकडे बॅगेत टाकण्यात आल्याची घटना समोर येत आहे. या मृतदेह महिलेचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

यापूर्वीची मुंबईतली घटना

दत्तक मुलीकडून प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या

मुंबई : दत्तक मुलीनं प्रियकराच्या मदतीनं वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी एका हत्या प्रकरणाची चार दिवसात उकल केलीय.

मुंबई पोलिसांच्या ताब्यातली ही रिया रिबेलो उर्फ आराध्या पाटील. रियाच्या टी-शर्टवर पापा की परी हे शब्द प्रिंट केलेत. पण याच रियानं तिच्या दत्तक वडलांचा खून केलाय. २ डिसेंबरला माहिम किनाऱ्यावर पोलिसांना मानवी अवयव असलेली एक सूटकेस मिळाली होती. या हत्येचा तपास करताना पोलिसांनी कपड्यावरील टेलरमार्क आणि फेसबुकची मदत घेत बेनेट रिबेलो असल्याची ओळख पटवली.

पोलिसांनी बेनेटचं घर गाठून त्याची दत्तक मुलगी रिया उर्फ अराध्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला ताकास तूर लागू न देणाऱ्या रियानं बेनेटची हत्या केल्याची कबुली केली. बेनेट लैंगिक शोषण करत होता, असा रियाचा आरोप आहे.

१६ वर्षांच्या मुलासोबत रियाचं प्रेम प्रकरण होतं. त्याच्या विरोधातून रियानं बेनेटची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे तीन बॅगांमधून वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठत एका हत्या प्रकरणाची उकल केलीय.