Nagpur Crime News: राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) आलेल्या विवाहित महिलेवर तिच्याच ओळखीच्या व्यक्तींनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सीताबर्डी परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. (Two Man Raped On Women)
पिंटु गजभिये, कार्तिक चौधरी अशी दोन आरोपींची नावे आहे. महिलेने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महिला मुळची मध्यप्रदेशातील आहे. गजभिये आणि तिची फेसबुकवर ओळख झाली. तेव्हा काम मिळवून देतो, असा बहाणा करत त्याने तिला नागपुरात येण्यास सांगितले. कामाच्या शोधात असलेल्या महिलेने त्याचे म्हणणं मान्य करत नागपुरात आली.
मध्यप्रदेशातून नागपुरात आल्यानंतर बस स्टँडवर घेण्यासाठी गजभिये आला होता. बाईकवरुन तिला एके ठिकाणी घेऊन जात असतानाच एका ठिकाणी थांबवून बाइक थांबवून तिला खाली उतरण्यास सांगितले. थोड्यावेळाने एक कार तिथे आले. त्याने तिला कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यानंतर ते नागपूर ग्रामीण येथील सावनेरमध्ये गेले.
गजभिये आणि त्याच्या मित्रांनी आधीच एक लॉज बुक करुन ठेवले होते. त्यामुळं त्यांच्या प्लाननुसार ते तिला लॉजवर घेऊन गेले. तिथे तिच्या पेयात गुंगीचे औषध मिसळले. महिला बेशुद्ध झाल्यानंतर दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपींनी तिला गाडीत बसवले व एका निर्जनस्थळी नेऊन सोडले.
महिलेने तिथे असलेल्या स्थानिकांच्या मदतीने पोलिस स्थानक गाठले आणि तक्रार दाखल केली. सक्कारदरा पोलिसांनी लगेचच सीताबर्डी पोलिसांशी संपर्क साधत घडलेली घटना सांगितली. महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला.
सीताबर्डी पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दोघांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पीडित महिलाही 34 वर्षीय असून दोन मुलांची आहे. पीडिता आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. साधारण तीन वर्षांपूर्वी तिची ओळख आरोपीशी झाली होती.
पांगरी येथे एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार अत्याचार झाल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व प्रकारानंतर पीडित मुलगी आणि तिचे आई वडील गावातूनच गायब असल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या चुलत भावाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करत न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.