लष्कराच्या जवानाकडून महिलेची गावभर धिंड

गळ्यात चप्पल घालून  ही धिंड काढण्यात आली,  उमरगा तालुक्यातील आलूर येथील ही घटना आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 23, 2017, 03:12 PM IST
लष्कराच्या जवानाकडून महिलेची गावभर धिंड

उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे,  आलूर गावात 55 वर्ष महिलेची धिंड काढण्यात आली.  गळ्यात चप्पल घालून  ही धिंड काढण्यात आली,  उमरगा तालुक्यातील आलूर येथील ही घटना आहे.

पत्नीची बदनामी केल्याचा आरोप

पत्नीच्या चारित्र्याबद्दल गावात चर्चा करून, परिवाराची बदनामी केल्याचा आरोप करत, एका लष्करातील सैनिकाने भावकीतील एका महिलेस मारहाण करत, तिची गावभर धिंड काढल्याची ही घटना आहे.

उस्मानाबाद येथील उमरगा तालुक्यातील आलुर येथे शुक्रवारी सकाळी ही घडली. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर सैनिकाला अटक

या प्रकरणी मुरूम पोलिसात रात्री उशिरा मारहाण संबंधित लष्कराच्या जवानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या महिलेवर उमरगा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.