चौथीही मुलगी झाल्याने विवाहीतेला मारहाण

मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी एकीकडे कन्याजन्माचं स्वागत केलं जातं. तसेच शासनाकडून विविध योजना आखल्या जातात.

Updated: Nov 28, 2017, 02:36 PM IST
चौथीही मुलगी झाल्याने विवाहीतेला मारहाण title=

जळगाव : मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी एकीकडे कन्याजन्माचं स्वागत केलं जातं. तसेच शासनाकडून विविध योजना आखल्या जातात.

मात्र आजही कुटुंबात वंशाचा दिवा पाहिजे म्हणून कन्यारत्नाला नाकारणारे देखील या समाजात आहेत. यासंदर्भातील एक धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे.

पती आणि सासूकडून मारहाण

जळगावात चौथ्या मुलीला जन्म दिला म्हणून ३० वर्षीय भारती खापरे या विवाहितेला पतीसह तिच्या सासूनं मारहाण केल्याची अमानुष घटना घडली आहे. गेल्या सात वर्षांपासून भारती खापरे हिला एकापाठोपाठ चार मुली झाल्या. तिसरी मुलगी झाली तेव्हा आपल्याला गच्चीवरून फेकून दिल्याचं भारतीनं सांगितलं.

तक्रार देऊनही पोलिसांची बघ्याची भूमिका

तसेच सासू मुलींना हातदेखील लावत नसल्याचा आरोप जखमी झालेल्या भारतीनं केला आहे. याबाबत स्थानिक जामनेर पोलीस ठाणे तसेच क्राईम ब्रांचला तक्रार देऊनही पोलिसांनी कोणताच हस्तक्षेप केला नसल्याचा आरोप जखमी भारतीनं केलाय.