मुंबई : World Breastfeeding Week : कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी कोविड-19 लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. पण लसीकरणासंदर्भात (Covid-19 vaccination) लोकांच्या मनात भिती असल्याने बहुतेक लोक लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यातच आता स्तनदा मातांसाठी लसीकरणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. मात्र लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने स्तनपान करणाऱ्या महिला ही लस घेण्यास पुढे येताना दिसून येत नाही. दरम्यान, याबाबत डॉक्टरांनी लसीकरण करुन घ्यावे, असा सल्ला दिला आहे. (Doctors apeal that Lactating mothers must take Covid vaccination ) पुण्यातील अपोलो क्लिनिकच्या प्रसूतिशास्त्रज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. अर्चना साळवे (Dr. Archana Salve) यांनी हा सल्ला दिला आहे.
‘जागतिक स्तनपान सप्ताह -2021’ च्या (World breastfeeding Week ) निमित्ताने स्तनपान करणाऱ्या मातांनी कोविड-19 लसीकरण करून घेणे खूप गरजेचं आहे, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. लसीकरणामुळे मातेच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज स्तनपानाद्वारे नवजात बाळाला मिळतात. यामुळे बाळाला कोरोना संसर्गाचा धोका कमी संभवतो, अशी माहिती डॉ. अर्चना साळवे (Dr. Archana Salve) यांनी दिली.
2020मध्ये कोरोनाने देशभरात एकच हाहाकार माजवला होता. कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या मनात भिती निर्माण झाली होती. या कोविड-19 व्हायरस संक्रमणाची चेन ब्रेक करण्यासाठी जानेवारी 2021 पासून लसीकरण अभियानाला सुरू करण्यात आली आहे. या अभियानातंर्गत 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. परंतु, गर्भवती आणि स्तनदा मातांना या लसीकरण अभियानातून वगळण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत गर्भवतींना संक्रमणाचा अधिक धोका असल्याचे म्हटले होते.
यासंदर्भात द इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’(ICMR), आणि ‘द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अॅण्ड गायनेकोलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) या संस्थांनी विविध अभ्यास आणि संशोधनानंतर गर्भवती आणि स्तनदा मातांना लसीकरणात समाविष्ट करून घ्या असे म्हटले. त्याद्वारे केंद्र सरकारने गर्भवती आणि स्तनदा मातांनाही लसीकरण करून घेण्याची परवानगी दिली आहे. परंतु, लसीकरणाबाबत अनेक कुटुंबांमध्ये अद्याप जागृती झालेली नाही. गर्भवती महिला व त्यांचे कुटुंबीय यांच्या मनामध्ये लसीकरणासंदर्भात भीती आहे. ही भिती काढून टाकणे गरजेचे आहे, असे मत डॉ. अर्चना साळवे (Dr. Archana Salve) यांनी व्यक्त केले.
Representational Image (Credit: Pixabay)
कोरोनाची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. भारतात सध्या कोविशिल्ड, कोवॉक्सिन आणि स्पुटनिक या तीन लस उपलब्ध आहेत. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी ही लस अतिशय फायदेशीर आहे. म्हणूनच मातांनी स्तनपान करणाऱ्या महिलांनी लसीकरण अजिबात टाळू नये. विविध संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, स्तनपान करणारी महिला लसीकरण करते तेव्हा तिच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज आईच्या दुधातून नवजात बाळाला जातात. यामुळे कोविड-19 विषाणूपासून बाळाचे संरक्षण करण्यात मदत मिळते. यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
लस घेतल्यानंतर ताप येणं, थंडी वाजून येणं, अंगदुखी, डोकेदुखी, इंजेक्शन दिलेल्या हातावरील भागात सूज येणं आणि थकवा जाणवणं, असा त्रास उद्भवू शकतो. परंतु स्तनपान करणाऱ्या महिलांना घाबरून जाऊ नये. लसीकरणानंतर ही लक्षणं दिसून येणं स्वाभाविक आहे. कोविड-19 लस माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. म्हणून लसीकरणाला घाबरून त्याकडे दुर्लक्ष करू नयेत, डॉ. अर्चना साळवे (Dr. Archana Salve) यांनी म्हटले आहे.