भोर : मकर संक्रांती बरोबर आज भूगोल दिन ही साजरा करण्यात येतो १४ जानेवारी हा दिवस जागतिक भूगोल दिन म्हणून राज्यातील शालेय पातळीवर मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात.
एका अर्थी ऋतुबदल होण्याचा हा दिवस सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते.
याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले.
त्यानुसार भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जातात. व्याख्याने, ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकांचे महत्त्व सांगणे, भौगोलिक सहली, नकाशे भौगोलिक साहित्याची प्रदर्शने, विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जातात.
वर्षांतून एकदा तरी या विषयावर लक्ष केंद्रित व्हावे, या उद्देशाने अनेक उपक्रम घेतले जातात. भोर च्या विद्याप्रतिष्ठान शाळेत ही असेच उपक्रम राबविण्यात आहे आहे