यवतमाळमध्ये भीषण अपघात, १० भाविकांचा मृत्यू

यवतमाळच्या कोसदनी घाटात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १० भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. ट्रक आणि कारची नागपूर तुळजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली.

Updated: Jun 1, 2018, 07:38 AM IST
यवतमाळमध्ये भीषण अपघात, १० भाविकांचा मृत्यू title=

यवतमाळ : यवतमाळच्या कोसदनी घाटात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १० भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. ट्रक आणि कारची नागपूर तुळजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की कारमधील १० भाविकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील भाविक पंजाब राज्यातील होते. नांदेड येथे दर्शनासाठी जात असताना अपघात झाला.