कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ७० कैदी पॅरोलवर, घरीच राहण्याच्या सूचना

कारागृहातून गावी पोहोचलेल्या कैद्यांना घरीच राहण्याचे निर्देश

Updated: Apr 11, 2020, 04:42 PM IST
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ७० कैदी पॅरोलवर, घरीच राहण्याच्या सूचना  title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यवतमाळ जिल्हा कारागृहातील ७० कैद्यांना ३० ते ४५ दिवसांच्या जामीनावर सोडण्यात आले आहे. 

कारागृहातून गावी पोहोचलेल्या कैद्यांना घरीच राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी दिली.

कारागृहातील कैद्यांची संख्या वाढत आहे. यवतमाळ जिल्हा कारागृहाची ब क्षमता २२९ ३एव्हडी असतानाही क्षमतेपेक्षा जास्त असे ४०० बंदी कारागृहात असल्याने ७० कैद्यांना काही कालावधीसाठी घरी थांबण्याच्या सूचना देऊन कारागृहातून तात्पुरती सुटका दिली. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कैद्यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहे. सर्दी, खोकला, ताप असणार्‍या कैद्यांना कारागृहात वेगळे ठेवण्यात येत आहे. त्यांची नियमित आरोग्य तपासणी देखील केली जात आहे.  

खासगी आणि राज्य परिवहन महामंडाळची बससेवा पूर्णत: बंद असल्याने कैद्यांना पोलिस वाहनातून घरी सोडण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्यावर पॅरोल वरील कैद्यांना पुन्हा कारागृहात परतावे लागणार आहे.