रुग्णसेवा करताना मंत्र्याशी बोलले नाही म्हणून डॉक्टरचे निलंबन

 यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय  रुग्णालयात धक्कादायक प्रकार

Updated: Feb 6, 2020, 10:51 AM IST
रुग्णसेवा करताना मंत्र्याशी बोलले नाही म्हणून डॉक्टरचे निलंबन  title=

यवतमाळ : रुग्णसेवा करीत असताना एका मंत्र्याशी भ्रमणध्वनीवर बोलण्यास नकार दिल्याने कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याचे निलंबिन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय  रुग्णालयात घडलाय.

वैद्यकीय पदव्युतर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अपघात कक्षात नेमणूक होती. रुग्णालयात रुग्णसंख्या वाढल्याने डॉक्टरांची उपचार करताना धावाधाव होत होती. 

यावेळी एका रुग्णाच्या नातेवाईकाने थेट मंत्र्यांना भ्रमणध्वनी लाऊन डॉक्टरांच्या हाती दिला. यावेळी उपचारार्थ रुग्णांना सेवा देत असलेल्या डॉक्टरने मंत्र्याशी बोलण्यास नकार देऊन रुग्णांच्या जीवीत्वाला महत्व दिले. 

डॉक्टरचे संभाषण मंत्र्यांने मोबाईलवरून ऐकले आणि त्यांचा पारा भडकला, त्यांनी लागलीच आपल्याला महत्व दिले नाही म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगून डॉक्टरला ८ दिवस निलंबन करण्याचे पत्र पाठवले.