पुण्यात थरार! इंजिनीयर तरुणीला बॉयफ्रेंडने संपवले; शेवटी मुंबई पोलिसांनी जेरबंद केले

पुण्यातील हिंजवडीमध्ये महिला IT अभियंताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.  आरोपी प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतेल आहे.   

Updated: Jan 28, 2024, 04:49 PM IST
पुण्यात थरार! इंजिनीयर तरुणीला बॉयफ्रेंडने संपवले; शेवटी मुंबई पोलिसांनी जेरबंद केले

Pune Crime News : पुण्यात हत्येचा थरार पहायला मिळाला आहे. इंजिनीयर तरुणीला तिच्याच बॉयफ्रेंडने संपवले आहे. प्रेयसीची हत्या करुन पुण्यात पलायन करणाऱ्या आरोपीला शेवटी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

आयटी नगरी हिंजवडी मध्ये एका हॉटेलमध्ये अभियंता महिलेची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वंदना दिवेदी असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ऋषभ निकम याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 
वृषभ आणि वंदना हे दोघेही मूळचे लखनऊचे असून दोघे दोन दिवसांपासून हिंजवडी मधील एका हॉटेलमध्ये राहत होते.

रविवारी पहाटे वंदना यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेनंतर ऋषभ हा हॉटेल मधून बाहेर जात असताना सीसीटीव्ही मध्ये आढळून आला. दरम्यान मुंबई पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये तो पिस्तूल सह मिळून आल्याने मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हत्येच्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिर्डीत वकिल दाम्पत्याची हत्या

राहुरी येथील न्यायालयात वकिली काम करणाऱ्या आढाव दांपत्याचे अपहरण करून दाम्पत्याचा हत्या केल्याची घटना घडली आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे या गावातील अमरधाम परिसरात असणाऱ्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री आढाव दांपत्याचे उंबरे येथील अमरधाम परिसराच्या विहिरीत मृतदेह आढळून आले. दगडाने बांधलेल्या अवस्थेत हे मृतदेह वर काढण्यात आले.नेमकी आढाव दांपत्याची हत्या कशातून झाली हे अद्याप समजले नाही. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह राहुरी पोलिसांचे पथक घटनस्थळी दाखल झाले होते..मृतदेहाचा पंचनामा करत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घटनेचा अधिक तपास राहुरी पोलीस करत आहेत.

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x