माझ्याकडे काय बघतोस, असे म्हणत तरुणावर धारदार शस्त्राने वार

​Attack on youth at Ulhasnagar : एका तरुणावर एका शुल्लक कारणावरुन दोघा अज्ञात तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला.  

Updated: Mar 28, 2022, 12:53 PM IST
माझ्याकडे काय बघतोस, असे म्हणत तरुणावर धारदार शस्त्राने वार title=

उल्हासनगर : Attack on youth at Ulhasnagar : एका तरुणावर एका शुल्लक कारणावरुन दोघा अज्ञात तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला. अर्जुन चौरसिया हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालचक्की परिसरात रात्रीच्या सुमारास घडली.

उल्हासनगरच्या लालचक्की परिसरात अर्जुन चौरसिया त्याच्या वडिलांची पान टपरी आहे. रविवारी रात्री अर्जुन हा वडिलांच्या टपरीवर उभा असताना तिथे एक तरुण आला आणि त्याने अर्जुन याला माझ्याकडे का बघतोस, असे म्हणत थेट मारहाण केली. यावेळी अर्जुनने प्रतिकार केला असता या तरुणाचे आणखी दोन साथीदार तिथे आले आणि त्यांनी त्याला मारहाण केली.

ते एवढ्यावर न थांबता त्यांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. या घटनेत अर्जुन हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.