Viral News: तरुणाने मगरीच्या तोंडात हात टाकला आणि पुढच्याच क्षणी पश्चाताप झाला; पाहा VIDEO

प्रेक्षकांसमोर तरुणाने स्टंट करत मगरीच्या तोंडात हात टाकला. यानंतर जे काही झालं ते पाहून प्रेक्षकांच्या पायाखालची जमीनच सरकली.   

शिवराज यादव | Updated: Sep 30, 2024, 06:28 PM IST
Viral News: तरुणाने मगरीच्या तोंडात हात टाकला आणि पुढच्याच क्षणी पश्चाताप झाला; पाहा VIDEO

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये स्टंटमन मगरीच्या तोंडात हात घालताना दिसत आहे. हा व्हिडीओ द मिलियन इयर्स स्टोन पार्क आणि पट्टाया क्रोकोडाइल फार्ममधील आहे. हा स्टंट करत असतानाच एका क्षणी सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. उपस्थित प्रेक्षकांसमोर हँडलरने मगरीच्या उघड्या तोंडात हात ठेवून धाडसी स्टंट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक आणि अनपेक्षितपणे मगरीने आपला जबडा बंद केला आणि हँडलरच्या हाताचा चावा घेत त्याला जखमी केलं.

Add Zee News as a Preferred Source

मगरीने जबडा बंद करतात स्टंटमनने त्याचा हात मागे खेचून घेतला. यावेली त्याच्या हातातून रक्त वाहत असल्याचं दिसत आहे. हे सर्व रक्त तिथे जमिनीवरही सांडलं. हा क्षण पाहिल्यानंतर उपस्थित प्रेक्षकांचाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. 

ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर या व्हिडीओला 42.8 मिलियन व्ह्यूज आणि 7 लाख 42 हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट करत आहेत. 

व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सना धक्का बसला, मगरीने आपला हात सोडला याचा आनंद झाला पाहिजे असं एका युजरने लिहिलं आहे. तर एकाने म्हटलं की, प्राण्यांशी खेळणं बद करा, तुम्हाला त्याची देहबोली समजत नाही. एकाने त्याला आयुष्यभराचा धडा मिळाला अशी कमेंट केली आहे. 

दरम्यान, पूर्व इंडोनेशियात नदीत आंघोळ करणाऱ्या एका महिलेला मगरीने ठार केलं. पोलीस आणि स्थानिकांनी गितले की, गावकऱ्यांनी नंतर मगरीची हत्या करत तिच्या शरीराचे काही भाग बाहेर काढले. इंडोनेशियामध्ये मगरींच्या अनेक प्रजाती आहेत ज्या नियमितपणे माणसांवर हल्ला करतात आणि त्यांना मारतात.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More