भावा तुझ्या हिमतीला सलाम! Zomato Delivery Boyचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसात...

Zomato Delivery Boy : प्रखर ऊन असो की मुसळधार पाऊस असो डिलिव्हरी बॉय सर्व अडचणींवर मात करत ग्राहकांपर्यंत त्यांचं सामान वेळेवर पोहोचवण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. सोशल मीडियावर सध्याच अशाच एका डिलिव्हीर बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 30, 2024, 06:39 PM IST
भावा तुझ्या हिमतीला सलाम!  Zomato Delivery Boyचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसात... title=

Zomato Delivery Boy : प्रखर ऊन असो की मुसळधार पाऊस असो डिलिव्हरी बॉय (Delivery Boy) सर्व अडचणींवर मात करत ग्राहकांपर्यंत त्यांचं सामान वेळेवर पोहोचवण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. सोशल मीडियावर सध्याच एका डिलिव्हीर बॉयचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी मुंबईत विजांच्या कडकटासह मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rain) पडला. संध्याकाळी तीन ते चार तास पडलेल्या या पावसाने मुंबईची तुंबई झाली. अनेक ठिकाणी पाणी साचलं. रेल्वे वाहतूक बंद पडली. तर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूकीच कोंडी झाली.

डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ व्हायरल

याच पावसात झोमॅटो (Zomato) या खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कंपनीचा एक कर्मचारीही अडकला होता. ग्राहकाने ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ घेऊन हा डिलिव्हरी बॉय आपल्या दुचाकीने निघाला. पण मुसळधार पावसाने त्याची दुचाकी मध्येच बंद पडली. पण डिलिव्हरीने हिंमत सोडली नाही. दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून त्याने तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढत ग्राहकाचं घर गाठलं आणि वेळेवर जेवण पोहोचवलं. डिलिव्हरी बॉयचं नाव राहत अली खान असून त्याने दाखवलेल्या हिमतीचं आता कौतुक होत आहे.

मुंबईत बुधवारी परतीच्या पावसाने कहर केला. अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. या पाण्यातून वाट काढत झोमॅटो डिलिव्हरी बॉय राहत अली खानने ऑर्डर ग्राहकापर्यंत पोहोचवली. त्याच्या या मेहनतीला सोशल मीडिआवर युजर्सने सलाम केला आहे. झोमॅटो ग्राहक स्वाती मित्तल यांनी राहत अली खानसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटलंय 'आम्ही जेवण ऑर्डर केलं होतं, पण डिलिव्हरी बॉयर राहत अलीची दुचाकी खराब झाली. पण यानंतरही तो परतला नाही. त्याने दोन पायी आमचं घर गाठलं. आमच्या घराजवळ जेव्हा तो पोहोचला तेव्हा तो पूर्णपणे भिजला होता, पण त्याने डिलिव्हरी पूर्ण केली' राहत अलीचे आभार मानत स्वाती यांनी 'आपण डिलिव्हीर स्टाफला पाठिंबा दिला पाहिजे, उन पावसातही ते आपलं जीवन सुखकर करतात, थँक्यू राहत... असं स्वाती यांनी म्हटलं आहे.

पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया

स्वाती मित्तल यांच्या पोस्टवर अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. लोकांनी डिलिव्हरी बॉयबरोबरच स्वाती मित्तल यांचंही कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी स्वाती मित्तल यांच्यावर टीकाही केली आहे. इतका मुसळधार पाऊस असताना त्यांनी जेवणाची डिलिव्हरी मागवायला नको हवी होती असं म्हटलं आहे.