पुण्यात तरूणाचा खून, तीन आरोपी अटकेत

पुण्यातील धायरीमध्ये एका तरुणाचा दगडानं ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2018, 04:38 PM IST
पुण्यात तरूणाचा खून, तीन आरोपी अटकेत title=

पुणे : पुण्यातील धायरीमध्ये एका तरुणाचा दगडानं ठेचून खून झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक पोकळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

तीन आरोपींकडून पोलिसांनी तत्काळ अटक

पु्ण्यात सोमवारी पहाटे अडीचच्या दरम्यान गणेशमळा परिसरात हा खून झाला. महत्वाचं म्हणजे हा खून करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. दारु पिताना झालेल्या जुन्या वादातून हा खून झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दोन दिवसापूर्वीही पुण्यात खून

दरम्यान, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दीपाली कोल्हटकर यांची पुण्यात गुरुवारी सायंकाळी हत्या झाली. एरंडवणे परिसरातील मैथिली अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. 

तसेच, तपासानंतर मदतनीस म्हणून कामाला येणारा किसन मुंडे याने दीपाली यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. चहा न दिल्याच्या रागात मदनीसाने हत्या केल्याचं समोर आलं आहे.