युवराज जाधव यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट पुरस्कार

विद्याप्रतीष्ठान संचलित वसुंधरा वाहिनी कम्युनिटी रेडियोचे केंद्र प्रमुख युवराज जाधव यांना भारतरत्न सरदार वाल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार २०१७ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट कडून देण्यात येतो. ३१ ऑक्टोबरला पार पडलेल्या सोहळ्यात युवराज जाधव यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत सावित्रीबाई

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 1, 2017, 11:01 PM IST
युवराज जाधव यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट पुरस्कार title=

बारामती : विद्याप्रतीष्ठान संचलित वसुंधरा वाहिनी कम्युनिटी रेडियोचे केंद्र प्रमुख युवराज जाधव यांना भारतरत्न सरदार वाल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार २०१७ ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट कडून देण्यात येतो. ३१ ऑक्टोबरला पार पडलेल्या सोहळ्यात युवराज जाधव यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत सावित्रीबाई

फुले सांस्कृतिक भवन,लोहिया नगर, पुणे येथे सायं ६ वा. हा कार्यक्रम पार पडला.  नेहरू युवा केंद्र युवक कल्याण, क्रीडा मंत्रालय भारत सरकार संलग्नित डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट यांच्यावतीने सदर पुरस्कारासाठी युवराज जाधव यांची निवड करण्यात आली होती. समुदाय रेडियोचा सामाजिक विकास व जनजागरणासाठी केलेला वापर, सामाजिक प्रश्न व त्यावर आधारित कल्पक संकल्पनेतून केलेले मनोरंजन आणि प्रबोधन या मुद्द्यांचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात आला. जाधव यांनी वसुंधरा वाहिनीवरून समाजोपयोगी कार्यक्रम प्रसारीत केले आहेत.  श्रोत्यांच्या विविध समस्यावर आधारित 'अधिकाऱ्यांच्या टेबलावरून', 'वाचाल तर वाचाल', 'ग- गणिताचा' व 'आयुष्य

घडविणारी मानसं' आदी श्राव्य मालिकांमधून त्यांनी शासन प्रणाली व समाज यांचा समन्वय घडवून आणला आहे. केंद्र सरकार पुरस्कृत विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या रेडियोवरील उपक्रमासाठी युवराज जाधव यांनी महाराष्ट्र व इतर राज्यातही तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पहिले आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्याला मिळालेली प्रेरणा असल्याची प्रतिक्रीया जाधव यांनी व्यक्त केली.