कोल्हापूर : कृषि क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना झी २४ तासच्या वतीने यंदा कृषिसन्मान देऊन गौरवण्यात येणार आहे. शनिवारी सायंकाळी कोल्हापुरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील आणि कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते कृषि क्षेत्रातील गुणवंतांना सन्मानित करण्यात येणार आहे.
अलिकडेच मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत या कृषिसन्मानार्थींची निवड करण्यात आली. या सोहळ्याला कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही करत आहोत.