'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!

कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती. 

Updated: May 8, 2020, 07:41 AM IST
'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले! title=

विष्णु बुरगे, बीड : कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती. मात्र, 'झी २४ तास'च्या बातमीनंतर गहाण ठेवलेले मंगळसूत्र सीताबाईंना परत मिळाले. सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. धुनीभांडी करून घर चालवनाऱ्या बीड शहरातील सीताबाई टाक यांना किराणा आणि पतीच्या औषधसाठी मंगळसूत्र गहाण ठेवावं लागलं होते, हे वास्तव 'झी २४ तास'च्या बातमीतून  पुढे आल्यानंतर  बातमीची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी पाच हजार रुपये देऊन मंगळसूत्र परत दिले. तसेच आरोग्याचा खर्च मिळाल्याने  सीताबाईच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यांनी खास 'झी २४ तास'चे आभार मानलेत. हे शक्य झाले ते 'झी २४ तास'मुळे!

माळीवेश भागात राहणारे ६० वर्षीय  काशिनाथ टाक व पत्नी सीताबाई टाक यांची हकीकत 'झी २४ तास'ने  बातमीमधून दाखवल्यानंतर बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांनी किराणा आणि मंगळसूत्र सोडवण्यासाठी लागणारे पाच हजार रुपये मदत केली. सीताबाई पाच हजार संबधीताना देऊन मंगळसूत्र सोडून आणले त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू तरळले.

तर याच बातमीची दखल घेत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील बीड मधील युवा सेनेचे पदाधिकारी विपुल पिंगळे यांना फोन करून आरोग्याचा लागणाऱ्या खर्चाची तजवीज केली आहे, उघड्यावर आलेल्या या कुटुंबा आता मोठा आधार मिळाला शिवाय दिलासाही, असे सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांनी सांगितले.

मात्र एकट्या सीताबाई टाकची अशी परिस्थिती नाही तर हातावर पोट असणाऱ्या हजारोची मजूर कामगारांना भाकरीचा संघर्ष करावा लागतोय,त्या ठिकाणी मदत पोचवण्यात प्रशासन कमी पडत आहे, हे मात्र खरं आहे. त्यांना यापुढे मदत मिळेल, अशी आशा आहे.