नांदेड: मराठा संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान नांदेडमध्ये हाणामारीचा आंदोलक आणि हॉटेल चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाली. नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये ही घटना घडली. मुखेड बाजारपेठेतील दुकानं आंदोलक बंद करत होते. एक हॉटेल चालू असल्यामुळे आंदोलकांनी हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली.
हॉटेलमधील सर्व सामानाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे हॉटेल चालक आणि त्याचे नातेवाईकही आक्रमक झाले. त्यामुळे आंदोलक आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. हा प्रकार 15 मिनिटाहून अधिक वेळ सुरु होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.