Mother's Day 2022: अभिनेत्री काजल अग्रवालकडून मुलाचा पहिला फोटो शेअर

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने महिन्याभरापूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र या बाळाचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला नव्हता. मात्र आज मदर्स डे निमित्त काजल अग्रवालने आपला मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो टाकत तिने भावूक पोस्टही लिहली आहे. 'तू मला शिकवलेस आई बनन म्हणजे काय असतं'. 'तू मला प्रेम करायला शिकवलसं' असे लिहत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तिच्या मुलाच्या या फोटोवर तुफान कमेंटस आणि लाईक्स पाऊस पडत आहे. 

Updated: May 8, 2022, 07:49 PM IST
 Mother's Day 2022: अभिनेत्री काजल अग्रवालकडून मुलाचा पहिला फोटो शेअर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने महिन्याभरापूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र या बाळाचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला नव्हता. मात्र आज मदर्स डे निमित्त काजल अग्रवालने आपला मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो टाकत तिने भावूक पोस्टही लिहली आहे. 'तू मला शिकवलेस आई बनन म्हणजे काय असतं'. 'तू मला प्रेम करायला शिकवलसं' असे लिहत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तिच्या मुलाच्या या फोटोवर तुफान कमेंटस आणि लाईक्स पाऊस पडत आहे. 

गेल्या एप्रिल महिन्याच्या 19 तारखेला काजल अग्रवाल आणि पती गौतम किचलू यांनी आपल्या मुलाचे या जगात स्वागत केले. हा दिवस दोघांसाठी खूप खास होता.  

काजलने आपल्या या मुलाचे नाव नील असे ठेवले होते. मात्र तिने आपल्या लहान मुलाचा फोटो कोणत्याच सोशल साईटसवर पोस्ट केला नव्हता. त्यामुळे काजल कधी तिच्या मुलाचा फोटो पोस्ट करते याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. 

आज मदर्स डे चा विशेष दिवस निवडत काजल अग्रवालने आपल्या मुलासोबतचा फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोसोबत ती स्वत: व्यक्त सुद्धा झाली आहे.  

काजल अग्रवालने आपल्या पोस्टमध्ये लिहले, माझा प्रिय नील, मी तूला सांगु इच्छीते, तू माझ्यासाठी खुप खास आहेस आणि तू यापूढेही खासचं असशील.  ज्यावेळेस मी तूला माझ्या कुशीत घेतले, तूझा चिमुकलासा हात माझ्या हातात घेतला, तुझ्या गरम श्वासांचा अनुभव घेतला आणि तुझ्या सुंदर डोळ्यांना मी पाहिले. 

मला माहीत होते, माझं तुझ्यावर आयुष्य भरासाठी प्रेम झाले आहे. तू माझा पहिला मुलगा आहेस,माझा पहिला मुलगा,माझा पहिला सर्वकाही असे तिने म्हटले आहे. 

काजल पुढे लिहते, येणाऱ्या वर्षात, मी तूला सर्व गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करेन, पण तू आताच मला खुप काही गोष्टी शिकवल्या आहेस. 

तू मला शिकवलेस आई बनन म्हणजे काय असतं. तू मला प्रेम करायला शिकवलस. तू मला शिकवलस माझ्या शरीराबाहेर देखील माझ्या हृद्याचा एक तुकडा आहे. मला अजून तुझ्याकडून खूप काही शिकायचे आहे. असे लिहत तिने मदर्स डे च्या स्वत:लाच शुभेच्छा दिल्या.