जीएसटीचा फटका फुल मार्केटला

फुलं घेतानाही दुकानदार आणि गिऱ्हाईकांना विचार करावा लागत आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 19, 2017, 02:43 PM IST
जीएसटीचा फटका फुल मार्केटला title=

मुंबई : दिवाळीचा सण देशभरात उत्साहात सादरा होत आहे. सर्वांची खरेदीची लगबगग पहायला मिळत आहेत. जीएसटी लागू झाल्याने वस्तू खरेदी करताना, रेस्टॉरन्टमध्ये विचारपूर्वक पैसे खर्च केले जात आहेत. आता फुलं घेतानाही दुकानदार आणि गिऱ्हाईकांना विचार करावा लागत आहे.

जीएसटीचा फटका काहीप्रमाणात फुल मार्केटसाही बसल्याचे बाजारात दिसून येत आहे. जीएसटी आणि नोटबंदीमुळे ग्राहकांमध्ये अजूनही संभ्रम असून, त्यामुळे ज्याठिकाणी २ ते ५ किलो फुलांची खरेदी व्हायची ती थेट एक किलोवर आल्याचे दिसून येत आहे. 
दादरच्या फुल मार्केटमधील परिस्थितीही काहीशी अशीच आहे. ऐन दिवाळीत वेगवेगळ्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात फुलं बाजारपेठेत आणली होती. मात्र, ग्राहकांचा कल फुलांची खरेदी करण्याकडे कमी असल्याचंच पाहायला मिळत आहे.