मुंबई : मुंबईजवळ असलेल्या डोंबिवली शहरात एका नवजात बालकाची हत्या करून मृतदेह इमारतीजवळ फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २० वर्षांची महिला व तीन व्यक्तींना अटक करण्यात आले आहे. कमलेश भानुशाली (२९), महेश बांदे (२४) आणि शांता बनर्जी (४५) अशी आरोपांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मानपाडा परिसरातील एका इमारतीत एका मुलाचा मृतदेह मिळाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहचताच त्यांना मुलाचा मृतदेह निळ्या रंगाच्या पिशवीत पॅक केलेला आढळला. पोलिसांनी सांगितले की, २० वर्षाच्या महिलेचे अन्य दोन आरोपींसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधातून महिला गर्भवती राहिल्यावर तिला गर्भनिरोधक गोळ्या देण्यात आल्या. परंतु, त्यानंतर देखील तिने प्री मॅच्युअर बाळाला जन्म दिला. या सगळ्या प्रकरणात तिच्या आईचा तिला पाठिंबा होता.
हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपीने गळा दाबून बाळाची हत्या केली आणि एका पिशवीत घालून इमारतीजवळ फेकून दिले. तपासणीमध्ये पोलिसांना कळले की, या इमारतीत काम करणारी एक महिला गरोदर होती. पोलिसांनी त्या महिलेची खोलवर चौकशी केल्यानंतर सत्य उघडकीस आले. मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कब्दूली या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.