मुंबईत शॉपिंग फेस्टिवलमध्ये १०० % कॅशबॅक

दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबई फेस्टिवल आजपासून सुरू होतोय..

Updated: Jan 12, 2018, 10:35 AM IST
मुंबईत शॉपिंग फेस्टिवलमध्ये १०० % कॅशबॅक

मुंबई : मुंबईत मनसोक्त शॉपिंग करायचं असेल तर ग्राहकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध होतेय.. दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबई फेस्टिवल आजपासून सुरू होतोय..

मुंबईभर वेगवेगळ्या ठिकाणी १२ ते ३१ जानेवारी दरम्यान या  फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. या फेस्टिवलमध्ये मॉल्स, रीटेल ब्रैंड्स आणि काही स्थानिक व्यापारी भाग घेणार आहेत

१०० टक्के कॅशबॅक

या फेस्टिवलमध्ये खवय्यांसाठीही पर्वणी असणार आहे. या शॉपिंग फेस्टिवलमध्ये ग्राहकांना सूटही मिळणार आहे.

त्याशिवाय पाचशे रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर १०० टक्के कॅशबॅक, सोन्याचं नाणं, हॉलिडे पॅकेज, मुंबईत घर आणि लक्झरी कार जिंकण्याचीही संधी मिळणार आहे.