सर्वात मोठी बातमी | अखेर दहावी-बारावी परीक्षेबाबत हा निर्णय घेण्यात आला

सर्वात मोठी बातमी | अखेर दहावी-बारावी परीक्षेबाबत हा निर्णय घेण्यात आला

Updated: Apr 12, 2021, 03:23 PM IST
सर्वात मोठी बातमी | अखेर दहावी-बारावी परीक्षेबाबत हा निर्णय घेण्यात आला

 मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता. 10 वी आणि 12 वी  महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 

 10 वीची परीक्षा जून महिन्यात होईल, तर 12 वीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटी घेतली जाईल. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

परीक्षांबाबतचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.