मुंबई : बँकेशी संबंधित काही काम राहीली असल्यास ती आजच मार्गी लावा. कारण आजच्यानंतर त्यासाठी अडचणी येऊ शकतात. येत्या 10 दिवसातील अनेक दिवस बँका बंद (Bank Holiday) राहणार आहेत. एप्रिलमध्ये एकूण 9 दिवस बँकांमध्ये काम होणार नाहीय. या सुट्या राज्यांनुसार बदलतात. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) यादीमध्ये बर्याच सुट्ट्या आहेत. या यादीमध्ये एप्रिलमध्ये बँका का आणि कोणत्या दिवशी बंद (Bank Closed) होतील हे समजून घ्या. जेणेकरून तुम्हाला त्याचे आधीच प्लानिंग करता येईल.
या महिन्यातल्या साधारण 15 दिवस बॅंकाना सुट्टी आहे. त्यापैकी 6 सुट्ट्या तर फक्त पुढच्या 10 दिवसात आहेत. 21 एप्रिलनंतर, एप्रिलमधील चौथ्या शनिवारी आणि 24 एप्रिल रोजी साप्ताहिक बंद झाल्यामुळे बँका बंद राहतील. असे असले तरी सर्व राज्यात 15 दिवसांची सुट्टी होणार नाही. कारण काही उत्सव संपूर्ण देशात एकत्र साजरे होत नाहीत.
गुढी पाडवा असल्यामुळे बँकांना 13 एप्रिल रोजी सुट्टी असेल.
दुसर्या दिवशी 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे बँकांमध्ये सुट्टी असेल.
15 एप्रिल रोजी, हिमाचल दिवस / बंगाली नवीन वर्षाचा दिवस बोहाग बिहू आणि सिरहुलची सुट्टी असेल.
त्यानंतर, बोहाग बिहूमुळे 16 एप्रिल रोजी बँका बंद राहतील आणि 18 एप्रिलला रविवारची सुट्टी असेल.
यानंतर राम नवमीच्या सुट्टी निमित्ताने 21 एप्रिल रोजी बँक बंद राहील.
त्यानंतर 24 एप्रिल रोजी चौथा शनिवार आणि 25 रोजी रविवारी बँकांमध्ये कोणतीही काम होणार नाही.
25 एप्रिलला रविवारी महावीर जयंती असल्याने बॅंक बंद असेल.