सुस्मिता भदाणे, झी मिडीया, मुंबई
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. आज सकाळी ११ वाजता आर्टस् , कॉमर्स, सायन्स शाखांकरता ही यादी असेल. मुंबई डॉट इलेवनथ अॅडमिशन डॉट नेट या संकेतस्थळावर ही यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर ६ ते ९ जुलैदरम्यान महाविद्यालयात प्रवेश दिले जातील. यंदा एकुण २३११४० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले असून मुलांचा सर्वाधिक कल वाणिज्य आणि कला शाखेकडे असल्याचं शिक्षण उपसंचालकांनी सांगितलंय. पहीली यादी जाहीर झाल्यानंतर ११तारखेला रिक्त जागांचा तपशिल जाहीर केला जाईल.
अकरावी प्रवेशा संबंधित माहीती संकेत स्थळावर जाहीर mumbai.11thadmission.net करण्यात आली आहे. त्यानंतर ६ ते ९ जुलै ह्या दिवसांत महाविद्यालयात प्रवेश दिले जातील. जर विद्यार्थाने भरलेल्या पसंतीत यादीतील पहील्या पसंतीचे कॉलेज ज्या विद्यार्थाना मिळेल त्यांना प्रवेश निश्चित करणे गरजेचे असेल .
यंदा एकुण २३११४० विद्यार्थानी प्रवेश भरले असुन मुलांचा सर्वाधिक कल वाणिज्य आणि कला शाखे कडे असल्याचे शिक्षण उप संचालकांनी सांगितले.
पहिली यादी जाहीर झाल्या नंतर ११तारखेला रिक्त जागांचा तपशिल जाहीर केला जाईल. पहिल्या गुणवत्ता यादीनंतर विद्यार्थ्याला दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा राहील.