170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, संसर्ग प्रमाणात मोठी वाढ

Coronavirus : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Updated: Jan 5, 2022, 11:26 AM IST
170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, संसर्ग प्रमाणात मोठी वाढ title=
संग्रहित छाया

मुंबई : Coronavirus : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, डॉक्टरांना (Doctor) संसर्ग होण्याचे प्रमाण गेल्या दोन लाटांपेक्षा अधिक झाले आहे. मुंबईतील जेजे, केईएम, नायर रुग्णालयात बाधित डॉक्टरांची संख्या जास्त आहे. 170 डॉक्टरांना कोरोना झाल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (170 resident doctors test Covid-19 positive)

कोरोना संसर्गाच्या या लाटेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची संख्या वाढली आहे. 170 बाधित डॉक्टरांमध्ये जेजे रुग्णालयातील 51, लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये 35, केईएममध्ये 40 आणि नायर रुग्णालयामधील 35 निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. संसर्गक्षमता अधिक असल्यामुळे डॉक्टरांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना संसर्गाच्या या लाटेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची संख्या मागील दोन लाटांच्या तुलनेमध्ये वाढत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती निवासी डॉक्टरांच्या संघटनेने दिली आहे. राज्यातील 170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

मुंबईत गेल्या 48 तासांत सुमारे 120 निवासी डॉक्टरांनी कोविड-19 पॉझिटिव्ह आणि राज्यभरात 170 हून अधिक तपासले आहेत. यापैकी जेजे रुग्णालयात गेल्या 24 तासांत 51 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 मुंबई शहरात आधीच निवासी डॉक्टरांची कमतरता आहे; कोविडच्या कारणास्तव अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णत सेवेत बाधा येईल, असे महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सचे (MARD) अध्यक्ष डॉ अविनाश दहिफळे यांनी सांगितले.