उत्तराखंडच्या प्रातिनिधिक भाषेचं पहिलं संमेलन मुंबईतील राजभवनात पार

उत्तराखंडच्या प्रातिनिधिक भाषेचं पहिलं संमेल्लन मुंबईतील राजभवनात पार पडलं. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे परिषदेचे प्रमुख पाहुणे होते.

Updated: Jun 5, 2022, 10:12 PM IST
उत्तराखंडच्या प्रातिनिधिक भाषेचं पहिलं संमेलन मुंबईतील राजभवनात पार  title=

मुंबई : उत्तराखंडच्या प्रातिनिधिक भाषेचं पहिलं संमेलन मुंबईतील राजभवनात पार पडलं. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे परिषदेचे प्रमुख पाहुणे होते. भाषेला आपणच वर आणलं पाहिजे तरच ती टिकेल. आपण आपल्या बोलीभाषा आणि भाषांचा वापर रोजच्या व्यवहारात शक्य तितका करायला हवा. कारण भाषा किंवा बोलीभाषा ही लिहिण्याची अपेक्षा, ऐकल्याने आणि बोलण्याल्याने आणखी वाढते, असे कोश्यारी म्हणाले. (1st convention of representative language of uttarakhand was held at raj bhavan in mumbai)

महाराष्ट्राच्या संस्कृतीचं कौतुक

राज्यपालांनी कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्राच्या संस्कृतीचे कौतुक केलं. "महाराष्ट्राच्या बहुभाषिकतेचे गुण आपण समजून घेतले पाहिजेत. जिथे मराठी भाषिक इतर राज्यांच्या तुलनेत हिंदी उत्तम बोलतात", असं म्हणत त्यांनी राज्याचं कौतुक केलं. 

उत्तराखंडच्या प्रातिनिधिक भाषेच्या या प्रयत्नाचे कौतुक कोश्यारी म्हणाले, "गढवाली-कुमाउनी या पौराणिक भाषा आहेत. त्यांचा स्वतःचा इतिहास आणि साहित्य आहे. या भाषांचं स्वरुप तसंच ठेवणे देखील आवश्यक आहे. तसेच हिंदी खडी बोलीत 22 बोली भाषांमधील शब्द एकत्रित करण्यात गढवाली कुमाऊनी या भाषेचं श्रेय आहे", कोश्यारी यांनी नमूद केलं. 

"उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भाषिक भेद असतानाही आतापर्यंतच्या राज्य सरकारांनी प्रातिनिधिक भाषेबाबत उदासीनता दाखवली. पण आता माननीय राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रयत्नाने प्रातिनिधिक भाषेला बळ मिळणार आहे", असा आशावाद कार्यक्रमाचे संयोजक श्री चामू यांनी व्यक्त केला.  

"उत्तराखंडमधील सर्व उपबोलींचे शब्द एकत्रित करुन त्याचं संरक्षण करावं. शाळांमधील परस्पर संवाद आणि शिक्षण यातूनच भाषा वाचेल. तसेच उत्तराखंडची प्रातिनिधिक भाषा गढवाल-कुमाऊंमधील भाषिक वैमनस्य दूर करेल, असं कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ बिहारीलाल जलंधरी म्हणाले. 
 
संमेल्लनात आलेल्या पाहुण्यांपैकी डॉ.आशा रावत यांनी भाषेच्या वैज्ञानिक परिभाषेकडे लक्ष वेधलं. तसंचउत्तराखंडच्या प्रातिनिधिक भाषेसाठी काम करण्यावर भर दिला.