मुंबईत मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर येथील अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Feb 7, 2018, 12:28 PM IST
मुंबईत मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न title=

मुंबई : अहमदनगर येथील अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून परीक्षा दिली होती. मात्र सरकारने निर्णय न दिल्याने वारंवार मंत्रालयात येत होता. न्याय न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

मंत्रालयासमोर अविनाश शेटे याने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो मूळचा अहमदनगरचा रहिवासी आहे. अविनाशने सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी परीक्षा दिली होती. मात्र नोकरी मिळत नसल्याने त्याने हे पाऊल उचलले, अशी माहिती दिली.