घाटकोपरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत तरुणाची हत्या

तरुणाचे चार-पाच दिवसांपूर्वी काही जणांसोबत भांडण झाले होते. 

Updated: Jul 29, 2019, 09:33 AM IST
घाटकोपरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत तरुणाची हत्या title=

मुंबई: घाटकोपर परिसरात रविवारी रात्री एका तरुणाची हत्या करण्यात आली. सात ते आठ लोकांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून हे कृत्य केल्याचे समजते.

बंटी उर्फ नितेश सावंत असं मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाचे चार-पाच दिवसांपूर्वी काही जणांसोबत भांडण झाले होते. 

त्याचा राग मनात ठेवून त्याची हत्या करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

नितेशचा काल वाढदिवस होता. यासाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी सात ते आठ जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी नितेशवर हत्यारांनी वार केले. यामध्ये नितेशचा मृत्यू झाला.