आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना कांदिवलीत अटक

पोलिसांनी तब्बल 26 मोबाईल, 1 टीव्ही, 1 लॅपटॉप, कार्ड स्वापिंगसह 91 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.  

Updated: Apr 19, 2019, 02:02 PM IST
आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना कांदिवलीत अटक title=
प्रतिकात्मक फोटो

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई  : देशात लोकसभा निवडणुकीसोबतच आयपीएलची जोरदार चलती पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या मॅचवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना कांदिवलीतील पोलिसांनी अटक केल्याची घटना समोर येत आहे. आयपीएलचा मौसम सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मॅचवर, खेळाडूंच्या कामगिरीवर तसेच कोणता खेळाडू किती रन करणार तसेच किती विकेट घेणार यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येतो. या सट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर पैशांची ऊलाढाल होते. तसेच मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन पद्धतीने देखील सट्टा खेळला जातो.

राजस्थान विरुद्ध पंजाब यांच्यात 16 एप्रिल रोजी जयपूर येथे मॅच खेळण्यात आली. या मॅचवर बेटिंग सुरु असल्याची माहिती कांदिवलीच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने कांदिवलीत छापा टाकून 5 जणांना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 26 मोबाईल, 1 टीव्ही, 1 लॅपटॉप, कार्ड स्वापिंगसह 91 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली.

 

p>

 

हे आरोपी देशातील मुंबई, दिल्ली, जयपूर यासारख्या महत्वाच्या शहरातील बुकींसह आंतरराष्ट्रीय बुंकीच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. हे आरोपी  dimondexch9.com आणि  playwin247.com या वेबसाईट्च्या साहाय्याने बेटिंग कोडवर्ड घेत असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी 13 एप्रिलला दादरमधून आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तसेच 6 एप्रिलला अकोल्यात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी अटक केली होती.