लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी पाण्यात पडलेला 5 वर्षांचा मुलगा बेपत्ता

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्या बोट बुडतांना वाचवलं पण नंतर बेपत्ता

Updated: Sep 25, 2018, 03:23 PM IST
लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी पाण्यात पडलेला 5 वर्षांचा मुलगा बेपत्ता

मुंबई : लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटल्यानंतर पाण्यात पडलेला सैयेश मर्दे अजूनही बेपत्ता आहे. पाण्यात बुडणाऱ्या इतरांना वाचवून नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण सैयेश मर्दे कुठे गेला याचा पत्ता लागलेला नाही. कुटुंबीय कालपासून मुलाचा शोध घेत आहे. आईच्या हातातून मुलाला कुणीतरी हिसकावून नेले पण त्याला कुठे नेले याची माहिती मिळू शकलेली नाही. सैयेश मर्दे या ५ वर्षाच्या मुलाचा शोध सुरु आहे.

सैयेश मर्दे बेपत्ता?

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना टळली होती. विसर्जनासाठी जाणाऱ्या ताफ्यातली बोट समुद्रात बुडाली. बोटीतल्या पाचही जणांना वाचवण्यात यश आलं होतं. काजल मेयर, अवनी, निलेश भोईर, अदनान खान, अनिता हे भाविक राजाच्या विसर्जनासाठी चालले होते. यावेळी त्यांची बोट समुद्रात बुडाली. या बोटमध्ये सैयेश मर्दे देखील होता.

वजन वाढल्याने बोट बु़डाली

वजन वाढल्यामुळे बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. बोटीमधले लोकं समुद्रात पडल्यानंतर लगेचच जीवन रक्षकांनी समुद्रात उड्या घेत या लोकांना वाचवलं होतं. पण सैयेश मर्दे बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.