Cabinet expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी NCP चा खळबळजनक दावा

Maharashtra Breaking: शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis) स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असताना राष्ट्रवादीने खळबळजनक दावा केला आहे.

Updated: Jan 24, 2023, 06:56 PM IST
Cabinet expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी NCP चा खळबळजनक दावा title=

Shinde-Fadnavis Cabinet expansion : राज्यात लवकरच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.  नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबतच्या (Unuon Home minister Amit Shah) बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही माहित दिली (Shinde-Fadnavis Cabinet expansion). दिल्लीत शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कमोर्तब झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या गंभीर दाव्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
  
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळलाी आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत विस्ताराचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनीही लवकरच विस्तार होणार असल्याचं बैठकीनंतर सांगितले. विशेष म्हणजे आधी शाह-शिंदे आणि फडणवीसांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर शाहांनी फडणवीसांसोबत स्वतंत्र बैठक घेतली. 

काय आहे राष्ट्रवादीचा दावा?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रणच दिलं नव्हतं, असा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. माहितीचा अधिकारातून (RTI) ही माहिती मिळाल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासेंनी केला. मात्र, राष्ट्रवादीचा हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कागदपत्र राज्यपालांकडे आहेत, राज्यपाल कार्यालयाकडे नाहीत असं आरटीआयमध्ये म्हटल्याचं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. 

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

ऑगस्ट 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. खाते वाटप जाहीर करण्यासही शिंदे-फडणवीस सरकारने विलंब केला. यानंतर आता चर्चा रंगलेय ती दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची. यामुळे सगळ्यांचेच लक्ष या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. 

असं आहे शिंदे फडणवीस सरकारचे पहिलं मंत्रिमंडळ

  1. राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  2. सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  3. चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  4. डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास
  5. गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
  6. गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता
  7. दादा भुसे: बंदरे व खनिकर्म
  8. संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन
  9. सुरेश खाडे: कामगार
  10. संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  11. उदय सामंत: उद्योग
  12. प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  13. रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  14. अब्दुल सत्तार: कृषी
  15. दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा
  16. अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  17. शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क