धक्कादायक:अभिनेता अभिषेक बच्चनलाही कोरोनाची लागण

अमिताभ आणि अभिषेक बच्चन दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Updated: Jul 12, 2020, 12:13 AM IST
धक्कादायक:अभिनेता अभिषेक बच्चनलाही कोरोनाची लागण

मुंबई: अभिनेता अभिषेक बच्चन AbhishekBachchan यालाही कोरोना व्हायरसची Coroanvirus लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काहीवेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर अमिताभ बच्चन यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटरवरुन आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. त्याचवेळी आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या कोरोना चाचणीचे अहवाल अद्याप आले नसल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते. 

#Breaking: अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण; नानावटी रुग्णालयात दाखल

मात्र, आता अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. फिल्मफेअरने ट्विट करुन ही माहिती दिली. त्यामुळे आता बच्चन कुटुंबातील इतर व्यक्तींनाही कोरोनाची लागण झाल्याचा धोका वाढला आहे. दरम्यान, अभिषेक बच्चनलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करुन ही माहिती दिली.

अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव

दरम्यान, अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांच्या जीवाला घोर लागला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सेलिब्रिटी आणि राजकीय वर्तुळातील लोकांनी बच्चन कुटुंबीयांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. अमिताभ बच्चन लवकरच 'कौन बनेगा करोडपती'च्या १२ व्या सीझनचे सूत्रसंचालन करणार होते. मे महिन्यात यासाठीच्या ऑडिशन होणार होत्या. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे हा प्रोजेक्ट लांबणीवर पडला आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा 'चेहरा', 'ब्रह्मास्त्र' आणि 'झुंड' हे चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.