पश्चिम रेल्वेचं प्रवाशांना ख्रिसमस गिफ्ट, गारेगार एसी लोकलचं उदघाटन

दुपारचे बारा वाजलेत..दिवस थंडीचे असले, तरी मुंबईत यावेळी लोकलचा प्रवास करणं म्हणजे घामाच्या धारा ठरलेल्या...पण आता मुंबईकरांचा लोकल प्रवास थंडगार झालाय. 

Updated: Dec 25, 2017, 12:18 PM IST
पश्चिम रेल्वेचं प्रवाशांना ख्रिसमस गिफ्ट, गारेगार एसी लोकलचं उदघाटन title=

मुंबई : दुपारचे बारा वाजलेत..दिवस थंडीचे असले, तरी मुंबईत यावेळी लोकलचा प्रवास करणं म्हणजे घामाच्या धारा ठरलेल्या...पण आता मुंबईकरांचा लोकल प्रवास थंडगार झालाय. 

सकाळी साडे दहा वाजता बोरीवलीहून चर्चगेटला रवाना झाली. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. 

उद्घाटनाच्या लोकलमध्ये मोजकेच सामान्य प्रवासी होते. पत्रकार आणि वृत्त वाहिन्यांच्या पत्रकारांसाठी एक वेगळा डबा देण्यात आला होता. सुटीचा दिवस असल्यानं स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती. लोकलचे ऑटोमॅटिक दरवाजे, मोठ-मोठ्या खिडक्या आणि फुलांची सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.