मुंबई : वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात विजय सिंग या संशयिताच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणी ५ पोलिसांचे निलंबन करण्यात आलंय. एका हाणामारीच्या प्रकरणात विजयसिंगला पोलिसांनी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेलं होतं. चौकशीवेळी त्याचा कोठडीत मृत्यू झाला.
विजयच्या नातेवाईकांनी विजयच्या मृत्यूची चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन केलं. शिवाय पोलिसांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची दखलव घेऊन पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. य़ा प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडं देण्यात आलाय.
आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. हिंसक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. तर आंदोलकांनी बेस्ट बसच्या काचा फोडल्यात.
विजय सिंग या तरुणाचा चौकशीदरम्यान पोलीस ठाण्यात मृत्यू झाला होता. पाच बडतर्फ पोलिसांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी आंदोलकांनी लाऊन धरली होती.