Aryan Khan Drugs Case : मुलाला भेटण्यासाठी शाहरूख चढला जेलची पायरी

आर्यन खानच्या भेटीला शाहरूख खान 

Updated: Oct 21, 2021, 09:44 AM IST
Aryan Khan Drugs Case : मुलाला भेटण्यासाठी शाहरूख चढला जेलची पायरी

मुंबई : ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली. आर्थर रोडमध्ये आर्यन खानला ठेवण्यात आलं आहे. बुधवारी आर्यन खानला जामीन नाकारल आहे. असं असताना आता आर्यन खानला भेटण्याची परवानगी दिल्यानंतर अभिनेता शाहरूख खान आपल्या मुलाच्या भेटीला गेला आहे. 

शाहरुख खान आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला आहे. आर्यनला भेटण्याची शाहरुख खानला परवानगी देण्यात आली आहे. तब्बल 19 दिवसांनंतर शाहरूख आर्यनला भेटणार आहे. आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख खान कारागृहात पोहोचला आहे. आर्यनला भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 

आर्यन खानचा बुधवारी जामीन अर्ज फेटाळला

-जामिनासाठी आर्यन खानची हायकोर्टात धाव
-मुंबई सत्र न्यायालयानं आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला
-आज हायकोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी
-आर्यनची न्यायालयीन कोठडीत वाढवण्याची NCBची मागणी

जेल प्रशासनाने बदलले नियम

- आजपासून नातेवाईक, वकिलांना कैद्यांना भेटता येणार
- जेल प्रशासनाकडून कोरोना नियमांमध्ये बदल
- कोरोनामुळे भेटण्यासाठी होती बंदी
- आर्थर रोड जेलबाहेर प्रशासनाकडून नोटीस
- यामुळे शाहरुख खानला आपल्या मुलाला भेटता येणार...