धारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर

Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)  

Updated: Dec 2, 2022, 03:08 PM IST
धारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर  title=
Adani Group to Dharavi Redevelopment Project Moto revealed read details Latest News in Marathi

Adani on Dharavi Redevelopment Plan : मुंबई..... (Mumbai) कोणासाठी पोट भरण्याची संधी देणारं शहर, कोणासाठी डोक्यावर छत देणारं शहर, कोणाला आसरा देणारं तर कोणाला आयुष्य घडवण्याची संधी देणारं शहर. अशा या मुंबईनं नाही म्हटलं तरी इथं येणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील किमान एक स्वप्नतरी साकार केलं असणारच. मुंबई म्हणजे गगनचुंबी इमारती, मुंबई म्हणजे मरीन ड्राईव्हचा समुद्र (Marine Drive), मुंबई म्हणजे ब्रिटीशकालीन इमारचींची शान आणि मुंबई म्हणजे प्रचंड गर्दी. पण, याच मुंबईचेही असंख्य चेहरे आहेत. याच मुंबईत विविध उत्पन्न गटातील नागरिक वास्तव्यास आहेत. इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)

60 हजारांहून जास्त कुटुंब असणाऱ्या या धारावी परिसरामध्ये अनेक कारखानेही आहेत. मानवी आयुष्यातील जगण्याचा खरा संघर्ष इथेच पाहायला मिळतो. जिथं दोन वेळच्या जेवणासाठीही अनेकांचीच आबाळ होते त्याच या धारावीविषयी एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. धारावीच्या पुनर्विकासासाठीची सर्वात महागडी बोली अदानी समुहातर्फे (Adani Group) लावण्यात आली. या प्रकल्पासाठी समुहाकडून तब्बल 5069 कोटी रुपयांची बोली लागली. आता पुढे अदानी समुहाकडून महाराष्ट्र शासनाकडे (Maharashtra government) एक आराखडा पाठवला जाईल आणि त्या धर्तीवर पुढील कामं सुरु होतील. 

धारावीच्या प्रकल्पात अदानी समुहाचा काय फायदा? (Dharavi redevelopment)

साधारण 620 एकर भूखंडावर धारावी झोपडपट्टीचा परिसर आहे. जिथं अदानी समुहाला पुनर्विकासासाठी जमीन देण्यात येईल. महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात आलेला हा प्रकल्प 20 हजार कोटी रुपयांचा असून, तो 7 वर्षांत पूर्ण होईल असा मानस आहे. यात अदानींता नेमका फायदा काय? 

अर्थविषयावर विश्लेषण करणाऱ्या संकेतस्थळांच्या माहितीनुसार अदानी समूह यामध्ये मोठी रक्कम गुंतवणार आहे. विश्वास बसणार नाही, पण 1882 मध्ये ब्रिटीशांपासून असणाऱ्या या झोपडपट्टी भागातून मिळणाऱ्या भूखंडाची किंमत अरबोंच्या घरात आहे. 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या भागाच्या पुनर्विकासानं अदानी समुहाला प्रचंड फायदा होणार आहे. त्यामुळं काहींच्या मते अदानी समुहाचा चहुबाजूंनी फायदाच आहे. 

हेसुद्धा वाचा : मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे? रहस्य जाणून व्हाल अवाक्

सध्याच्या घडीला सर्वात गुंतागुंतीची आणि श्वासही घ्यायला जागा नसणाऱ्या या झोपडपट्टीला पुनर्विकासानंतर पूर्णपणे नवं रुप देण्यात येणार आहे. इथं मोठी घरं असणाऱ्या इमारतींपासून कमर्शिअल कॉम्प्लेक्सही असणार आहेत. परिणामी इथं जमिनीचे भावही प्रचंड वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Land  rates in mumbai)