मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे? रहस्य जाणून व्हाल अवाक्

Mukesh Ambani  : मुकेश अंबानी यांच्याबद्दल जाणून घ्यायला अनेकांना आवडतं. मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे, याबद्दल जाणून तुम्हाला धक्का बसेल. 

Updated: Dec 1, 2022, 03:42 PM IST
मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे? रहस्य जाणून व्हाल अवाक् title=
Mukesh Ambani house Antilia Garbage What do they You will be shocked to know trending news nmp

Mukesh Ambani House Antilia : फोर्ब्स 2022 द्वारे देशातील 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. फोर्ब्सनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani)यांच्याकडे एकूण 1,211,460.11 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची एकूण संपत्ती 710,723.26 कोटी रुपये आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. ईशा अंबानी (Isha Ambani) यांनी 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. मुलीचं नाव आदिया, तर मुलाचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलं आहे.  अंबानी कुटुंबाच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात.  आज आम्ही तुम्हाला त्यांचा घरातील एक गुपित सांगणार आहोत. 

मुकेश अंबानी यांच्या घरातील कचरा जातो कुठे?

मुकेश अंबानी हे पत्नी नीता, मुले आणि आईसह मुंबईतील 27 मजली (Mumbai Antilia) अँटिलियामध्ये राहतात. सुमारे अकरा हजार कोटी रुपयांच्या या घरात एकापेक्षा एक हायटेक सुविधा आहेत. त्यामुळे या आलिशान घराला सांभाळण्यासाठी सुमारे 600 नोकर काम करतात.  या घरातील स्वच्छता केल्यानंतर जो कचरा असतो त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक वेगळी कल्पना शोधण्यात आली आहे. या घरातील कचरा हा बाहेर फेकल्या जात नाही. मग त्याचं करतात तरी काय? (Mukesh Ambani house Antilia Garbage What do they You will be shocked to know trending news)

आश्चर्याचा बसेल धक्का

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानीच्या घरातील कचऱ्यापासून अँटिलियामध्येच वीज बनवली जाते. ही वीज घरातच वापरली जाते. कचऱ्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी अंबानींच्या घरात सुका कचरा आणि ओला कचरा वेगवेगळा ठेवला जातो आणि त्यानंतर पद्धतशीर नवीन तंत्रज्ञानाद्वारे वीज निर्माण केली जाते. 

मात्र संपूर्ण अँटिलियाचा वापर पूर्ण करण्यासाठी वीजनिर्मिती पुरेशी नाही. कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी अँटिलियामध्ये मिनी प्लांट उभारण्यात आला आहे. मात्र याबाबत अंबानी कुटुंबातील सदस्याकडून कधीही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x