Aditya Thackeray : मुंबईत आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडले

Aditya Thackeray :  युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडल्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 3, 2023, 03:51 PM IST
Aditya Thackeray : मुंबईत आदित्य ठाकरे यांचे बॅनर अज्ञाताने फाडले
Aditya Thackeray banner

Aditya Thackeray banner : मुंबईतील दादरमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे बॅनर अज्ञाताने फाडले आहे. (Political News in Marathi) याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. काल दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिव्हलचे उद्घाटन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होते. (Maharashtra News in Marathi) मात्र आज आदित्य ठाकरेंचा फोटो असलेल्या बॅनरवर अज्ञाताकडून कट मारण्यात आले होते. यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News in Marathi)

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर सातत्याने टीका करत आहेत. तसेच आदित्य यांच्यावरही शिंदे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात येत आहे. ठाण्यातून निवडून दाखला, असा सल्लाही देण्यात आला. मात्र, आता आदित्य ठाकरे अधिकच आक्रमक झालेत. मी राजीनामा देतो, एकनाथ शिंदे यांनी माझ्यासमोर वरळीत लढून दाखवावे, असे थेट आव्हान दिले आहे.

दरम्यान, राज्याच्या दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांचे जळगाव येथे गतवर्षी ऑगस्टमध्ये बॅनर फाडले होते. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली होती. त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले होते. धरणगावातील प्रवेश मार्गावर लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना मध्यरात्री घडली. त्यामुळे परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला होता.

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात होती. पाचोरा, धरणगाव, पारोळा येथील शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात आदित्य यांच्या सभा झाल्या होत्या.