मुलीच्याआत्महत्येनंतर वडिलांनी स्वत:ला रेल्वे खाली झोकून दिले!

 येथे धक्कादायक घटना घडली. मुलगी आणि पित्याने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.

Updated: Jul 1, 2017, 10:40 PM IST
मुलीच्याआत्महत्येनंतर वडिलांनी स्वत:ला रेल्वे खाली झोकून दिले! title=

विरार :  येथे धक्कादायक घटना घडली. मुलगी आणि पित्याने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.

 मंजुळा मोथुकृष्णा नायडू या २६ वर्षीय मुलीने  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या मुलीने आत्महत्या केल्याने मुलीचा विरह सहन न झाल्याने पित्याने रेल्वे खाली उडी मारुन आत्महत्या केली. मोथुकृष्णा नायडू (६०)असे वडिलांचे नाव आहे.

आज दोघांवर नालासोपारा स्मशानभूमीत एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.  २८ जून रोजी मुलीने आत्महत्या केली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ जूनलापित्याने आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.