...तर अन्नदात्याचं अन्नत्याग आंदोलन होणार- अजित नवले

शेतक-यांचं १२ लोकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्यांबाबत विधीमंडळात दाखल झालं असून चर्चेतून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर या चर्चेतून काहीच निष्फळ झालं नाही तर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलाय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 12, 2018, 03:24 PM IST
...तर अन्नदात्याचं अन्नत्याग आंदोलन होणार- अजित नवले title=

मुंबई : शेतक-यांचं १२ लोकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्यांबाबत विधीमंडळात दाखल झालं असून चर्चेतून काय मार्ग निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर या चर्चेतून काहीच निष्फळ झालं नाही तर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते अजित नवले यांनी दिलाय. 

अन्नदात्याचं अन्नत्याग आंदोलन

सरकारसोबत चर्चा पुढची रणनिती ठरली जाईल. जर या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर आम्ही ठरल्याप्रमाणे विधानसभेला घेराव घालणार आहोत. आम्ही आमच्या ताकदीने निघू, जिथे रोखलं जाईल तिथेच बसू, अन्नदात्याचं अन्नत्याग आंदोलन आम्ही करू, असा इशारा अजित नवले यांनी दिला. 

फडणवीसांच्या भाषणबाजीवर विश्वास नाही

आम्हाला कालबद्ध कार्यक्रम हवाय. मागण्या लेखी मान्य केलेल्या हव्यात, त्यासोबतच त्याची अंमलबजावणी कशी होईल याबाबत ठोस कार्यक्रम हवाय. तरच आम्ही विश्वास ठेवू, फडणवीसांच्या भाषणाबाजीवर विश्वास ठेवणार नाही, असे अजित नवले म्हणाले.