मुंबई : मुंबईत आझाद मैदानावर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी या उपोषण आंदोलनाचा आज बारावा दिवस आहे. या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी आज सकाळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आले होते, या आधीच राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख देखील येथे उपस्थित होते. याचवेळी अजितदादा आणि सरकारचे मंत्री आमनेसामने आले.
सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत, असं समजल्यावर अजितदादांनी आझाद मैदानात इतर विषयांवर आंदोलन करीत असलेल्यांची भेट घेतली. तरीही सुभाष देशमुख तिथेच होते. काही वेळ अजित पवार आणि धनंजय मुंडे हे खोळंबले.
पण सुभाष देशमुखांचं अजून आटोपत नाहीय, म्हणून अजितदादा आणि धनंजय मुंडे हे सकल मराठा समाजाच्या उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीला गेले. यावेळी सरकारचे मंत्री सुभाष देशमुख आणि अजितदादा आमने-सामने आले. यावेळी मंत्र्यांनी आणि अजितदादा तसेच धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेतलं.