भर कार्यक्रमात अजितदादांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, 100 कोटी देतो ते काही घरचे देत नाही !

Ajit Pawar Slammed the officers : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भर कार्यक्रमात भडकल्याचे चित्र दिसून आले. पुन्हा एकदा अजितदादा यांचा पारा चढलेला दिसून आला.   

Updated: Jun 5, 2022, 03:50 PM IST
भर कार्यक्रमात अजितदादांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर, 100 कोटी देतो ते काही घरचे देत नाही ! title=

मुंबई : Ajit Pawar Slammed the officers : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भर कार्यक्रमात भडकल्याचे चित्र दिसून आले. पुन्हा एकदा अजितदादा यांचा पारा चढलेला दिसून आला.  त्यांनी भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले, त्यावेळी अधिकाऱ्याचा चेहरा पडलेला दिसून आला. तंबी देताना सुनावले की,  दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे. सगळ्या गोष्टींचे बारकावे पाहिले पाहिजे. हे कोणी केले त्याच्यावर कारवाई करा, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी त्यांना बजावले.

मुंबईतील जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अजितदादा भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. पुरस्कार वितरण नियोजनावर अजितदादा नाराज दिसून आले. मी स्पष्ट बोलतो हे राज्याला माहीत आहे. माझं मत असे आहे की, जी बक्षिसे दिली आहे. ती त्या त्या भागाल्या गावातील लोकांना कळलं की बक्षीस मिळाले. पण त्या गावात कचरा देखील आहे मग काय म्हणतील लोक? मी या नंबरवर अविश्वास दाखवत नाही, असे ते म्हणाले.

गेल्या महिन्यापर्यत आमचे लोक नगराध्यक्ष म्हणून काम करत होते पण आता प्रशासक बसले. मात्र त्यांना देखील आज इथे बोलवायला हवं होतं. तुम्ही आता म्हणता बोलवलं होते पण ते आले नाहीत. मला वाटत हे पुन्हा होता कामा नये. लोकांना मान मिळाला पाहिजे. अधिकाऱ्यांना नाही मिळाला तरी चालेल, अशी स्पष्ट शब्दात नाराजी अजितदादांनी भर कार्यक्रमात व्यक्त केली.

अधिकाऱ्यांसोबत तुम्ही लोकप्रतिनिधीना बोलवायला हवं होतं. अजितदादा 100 कोटी देतो ते काही घरचे देत नाही. कार्यक्रम नीट झाला पाहिजे. ज्या कोणी अधिकाऱ्याने चूक आहे, त्याच्यावर कारवाई करा. 150 काय 200 कोटी देऊ, पण मी आता दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे, अशी तंबीच अधिकाऱ्यांना दिली.

चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप पडावी ही सर्वांचीच भावना असते. लोकसहभाग, लोक चळवळ महत्वाची आहे. मी स्पष्ट बोलतो हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे, बक्षीस देताना गुण ठेवा, सहा विभागात कोणीही पहिला नाही आला तर निरंक लिहा. गेल्या महिन्यापर्यंत लोकप्रतिनिधी होते, त्यांचा कालावधी संपला पण त्यांना बोलावले असते तर त्यांना बरे वाटले असते, बोलावले पण आले नाहीत, असे सांगितले गेले. पण असे होऊच शकत नाही. महाराष्ट्राला जरा कठीण वाटतं पण मी बरोबरच बोलतो. अजित पवार 100 कोटी देतो तेव्हा निधीचे वाटप योग्य झाले पाहिजे, चुका करणार आणि 150 कोटी मागणार हे चालणार नाही, असे सांगत अधिकाऱ्यांना भाषणातच अजितदादा यांनी फैलावर घेतले.