अजूनही लसींचा पुरेसा पुरवठा राज्याला होत नाहीय - अजित पवार

राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची गरज आहे, पण केंद्राकडून पाहिजे तेवढ्या प्रमाणात 

Updated: Jul 9, 2021, 10:50 PM IST
अजूनही लसींचा पुरेसा पुरवठा राज्याला होत नाहीय - अजित पवार title=

मुंबई  : राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची गरज आहे, पण केंद्राकडून पाहिजे तेवढ्या प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरणाला वेग येत नाही,  असं अजित पवार यांनी आज पुण्यात सांगितलं. राज्यासह पुण्यात पुरेशा लसी उपलब्ध नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे, राज्याला आणखी लसींची गरज असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसेच ज्यांनी लसींचे २ डोस घेतले आहेत, त्यांनी देखील अजूनही मास्क वापरणे बंधनकारक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

इस्त्राईलने ८० ते ९९ टक्के लसीकरण पूर्ण केल्यानंतर मास्क वापरणे बंद केले. पण पुन्हा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा मास्क लावणे सुरु केले, असं उदाहरण यावेळी अजित पवार यांनी दिलं, एवढंच नाही तर जपानच्या राजधानीत आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली आहे, म्हणून तुमचे २ डोस जरी तुम्ही घेतले असले तरी मास्क वापरणे सुरुच ठेवा, कारण हा व्हायरस नवीन आहे, याची लक्षणं अजूनही ओळखण्यात अडचणी असाव्यात असं त्यांनी म्हटलं आहे.