Maharashtra Corona Update | चिंताजनक! राज्यातील मृत्यू दरात वाढ, दिवसात किती रुग्ण?

राज्याच्या मृत्यू दरात वाढ झाली आहे.

Updated: Jul 9, 2021, 09:59 PM IST
Maharashtra Corona Update | चिंताजनक! राज्यातील मृत्यू दरात वाढ, दिवसात किती रुग्ण?  title=

मुंबई :  राज्याची दिवसभरातील कोरोना आकडेवारी समोर आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या खाली आहे. तसेच आज कोरोना बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आहे. दिवसभरात राज्यात एकूण  8 हजार 992 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतच्या कोरोना बाधितांचा आकडा हा 59,00,440 इतका झाला आहे. (today 9 july 2021 in maharashtra  8 thousand 992 corona patients found) 

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये  10 हजारांपेक्षा अधिक जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात दिवसात एकूण 10 हजार 458 जणांनी यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा एकूण 96.08 % झाला आहे.  

मृत्यू दरात वाढ

कोरोनामुळे दिवसभरात 200 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी राज्यातील मृत्यू दरात काही अंशी वाढ झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा आता 2.03 % इतका झाला आहे. काही दिवसांपासून हा मृत्यू दर 2.0 तसेच 2.01 इतका होता. ही वाढ .2 ने झाली असली तरी त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. सध्या राज्यात 6 लाख 27 हजार 243 व्यक्ती होम क्वारटाईन आहेत तर 4 हजार 756 व्यक्ती संस्थातमक विलिगिकरणात आहेत. 

राज्यात ऍक्टीव्ह रुग्ण किती?

राज्यात आज एकूण 1 लाख 12 हजार 231 सक्रीय रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. राज्याची आरोग्य यंत्रणा या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी मेहनत घेत आहे. 

मुंबईत किती रुग्ण?  

मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ-घट कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दररोजची रुग्णसंख्या ही 500 पेक्षा कमी होती. मात्र आज मुंबईत 600 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

तर 566 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 7 लाख 974 जण बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 96% टक्के इतका आहे.  मुंबईत सध्या 7 हजार 731 सक्रीय रुग्ण आहेत.