मुंबई : राज्यात मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी भाजप सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची ही हकालपट्टी करण्यात आली आहे.
Breaking news । मुंबई : विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवारांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी । अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने झाली हकालपट्टीhttps://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/rrDSUOEh5U
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 23, 2019
अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचे पत्र देत पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, अशा आशयाचे ट्विट शरद पवार यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीने अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते.
Ajit Pawar's decision to support the BJP to form the Maharashtra Government is his personal decision and not that of the Nationalist Congress Party (NCP).
We place on record that we do not support or endorse this decision of his.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019
आता अजित पवार किती आमदार आपल्यासोबत नेणार याचीही उत्सुकता आहे.