राज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार

राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

Updated: Sep 28, 2019, 05:55 PM IST
राज्य सहकारी बॅंक संचालक मंडळात असल्याने ही केस पुढे आणली - अजित पवार title=

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी बातमी घडली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात. त्यानंतर तब्बल २० तासांपेक्षा जास्त काळानंतर अजित पवार यांनी राजीनाम्यानंतर मौन सोडले. काल अचानक राजीनामा दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत कोणताही घोटाळा झालेला नाही. एवढा कोटीचा घोटाळा असा उल्लेख होतो. कोणीही उठतं आणि आरोप करतो. कारखानदारी टिकविण्यासाठी मदत म्हणून कर्ज दिले गेले. आतापर्यंत कर्ज फिटलेले आहे. कोणाचेही थकीत नाही. तसेच आज पंजाब-महाराष्ट्र बॅंकेचे काय झाले. ते पाहा. त्या बॅंकेवर कोण आहेत, ते पाहा आणि माहिती काढा, असे  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, मात्र, मी वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि हिचचिंतकांना न सांगता राजीनामा दिला. त्यांच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. मी कोणाला काही सांगितले असते तर ते नाही म्हणाले असते. म्हणून मी कोणाला न सांगता राजीनामा दिला. मी माझ्या सद्विवेकबुद्धीला स्मरुन राजीनामा दिला. त्याआधी मी उपमुख्यमंत्री असताना राजीनामा दिला. यावेळी मात्र, कोणाला न सांगता राजीनामा दिला. त्यामुळे माफी मागतो, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र सहकारी बॅंक संचालक मंडळात अजित पवार यांचे नाव होते म्हणून हा सगळा प्रकार पुढे आला आहे. मी सांगतो माझे नाव नसते तर राज्य सरकारी बॅंकेचे प्रकरण पुढे आले नसते. केस उभी राहिली नसती. तसेच ज्यांचा यात दुरान्वये संबंध नाही, त्यांना त्यात गोवले. शरद पवारांचे नाव आलेच कसे, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.

 महाराष्ट्र सहकारी बॅंक भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने अजित पवार व्यथित झालेत. सहकारी बॅंकेत सर्वपक्षीय नेत्याचा समावेश आहे. कोणीही उठतं आणि आरोप करतो. कारखानदारी टिकविण्यासाठी मदत म्हणून कर्ज दिले गेले. आतापर्यंत कर्ज फिटलेले आहे. कोणाचेही थकीत नाही. तसेच बॅंकेत मोठ मोठे नेते संचालक होऊन गेले आहेत. २५ हजार कोटी रुपयांचा आकडा आला कोठून? काहीही सांगता, कोणीही काहीही आरोप करत सुटत आहे, हे योग्य नाही, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

शरद पवारसाहेबांचे नाव कसे आले? २५ हजार कोटींचा आकडा. माझ्यामुळे साहेबांचे नाव आले. ते आमचे कुटुंबप्रमुख होतो. त्यांना मी काही सांगून निर्णय घेतो. मला काही सूचत नव्हते. त्यामुळे मी मुंबईत माझ्या नातेवाईकाच्या घरी होतो. माझ्याबद्दल अनेक वावड्या उठवल्या गेल्या. ज्यावेळी मी राजकारणात आलो, त्यावेळी पवार कुटुंबात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. सुप्रिया सुळे माझ्यात चांगले नाही. पार्थ लोकसभेला उभा राहिला त्यावेळीही तसेच. आता रोहित चांगले काम करत आहे. त्याच्याबद्दलही सोशल मीडियावर बातम्या पेरल्या गेल्या आहेत. मात्र, पवारसाहेबांनी सांगितले की, आम्ही एक आहोत. कोणताही कलह नाही. तेच माझे म्हणणे आहे. आम्हाला भावना आहेत की नाही? राजीनामा दिल्यानंतर एकांतात गेलोहोतो. आमचं कुटुंब एकत्रच आहे. पक्षाते जे लोक सोडून गेल्याचे दु:ख आहे, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.